कहाणी - बकची आणि जॅक लंडनचीही!
एका वेगळ्या पातळीवर बकची ही कथा जॅक लंडनच्या आयुष्याचीही कथा आहे. अलास्कातल्या वास्तव्यात स्वतःची ओळख होईपर्यंतचं जॅकचं आयुष्य काहीसं भरकटलेलं होतं. त्याने हमाली आणि सटर-फटर कामांपासून, ते जहाजावर खलाशी म्हणून काम करण्यापर्यंत अनेक प्रकारची कामं केली होती; पण या सर्वांतून तावून सुलाखून निघालेला जॅक अलास्कातल्या कठीण परिस्थितीत तग धरून राहिला, नव्हे, तो निसर्गावर मात करून जिवंत राहू शकला........